गेल्या महिन्यात २७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने काँग्रेसचे राज्यसभेचा उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. त्यानंतर कित्येक दिवस हिमाचल प्रदेशमध्ये सरकार बदलाचे वारे वाहत होते. अनेकांनी ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा आरोप देखील केला. मात्र त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवले होते. आता त्याच आमदारांबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगसाठी अपात्र ठरलेल्या हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सहा आमदारांनी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशचे तीन अपक्ष आमदार होशियार सिंह, केएल ठाकूर आणि आशिष शर्मा यांनीही औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देवेंद्र कुमार भुट्टो यांना हिमाचल प्रदेश विधानसभेत उपस्थित राहून पक्षाच्या व्हिपची अवज्ञा केल्याबद्दल आणि कट मोशन आणि बजेट दरम्यान राज्य सरकारच्या बाजूने मतदान केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. 29 फेब्रुवारी. निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २७ तारखेला हिमाचल प्रदेशमध्ये मतदान झाले. यांमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. काँग्रेसकडे आपला उमेदवार निवडणून आण्यासाठी बहुमत होते. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. मात्र कॉग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी काँग्रेसच्या ६ आमदारांना अपात्र केले आहे. काँग्रेस आमदारांनी पक्षाचा व्हीप न पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.