देशामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अजून निश्चित झालेले नाही. देखील अजून जाहीर झालेली नाही. भाजपाने २५ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र महायुतीप्रमाणेच मविआमध्ये देखील जागावाटपाचा तिढा अजूनही कायमच असल्याचा पाहायला मिटलोय. दरम्यान हा तिढा डोसवण्यासाठी मातोश्री बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीला शरद पवार देखील हजर राहणार आहेत. आजची बैठक निर्णयाक ठरण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री बंगल्यावर ही बैठक संध्याकाळी पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत तिढा सुटणार का हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. ठाकरेंनी सांगलीची जागेवर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. तर इकडे महायुतीमध्ये देखील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. बारामती, माढा, सातारा अशा अनेक जागांवर रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील काही जागांवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि अशा अनेक जागांवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे. मनसे देखील महायुतीमध्ये सामील झाल्यास त्यांना किती व कोणत्या जागा मिळणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.