लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. सर्व पक्ष आता आपले उमेदवार जाहीर करत आहेत. तर भाजपने (BJP) आता त्यांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे (Kangana Ranuat) नाव आहे. त्यामुळे आता कंगना रनौत राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने कंगनाला लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. दरम्यान त्यानंतर कंगना रनौतने ‘एक्स’ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर कंगना रनौतने ‘एक्स’ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते, ”माझा प्रिय देश आणि देशातील जनतेचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला मी नेहमीच पाठिंबा दिला आहे. आज भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझे जन्मस्थान असलेल्या हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अधिकृतपणे पक्षात सामील झाल्याबद्दल मला सन्मान आणि आनंद वाटतो. मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक होण्यासाठी उत्सुक आहे.”
भाजपाने आतापर्यंत आपल्या लोकसभा उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. कंगना रणौतला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या मंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या प्रतिभा सिंह या विद्यमान खासदार आहेत. तर आता भाजपने ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी कंगनाला उमेदवारी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावे समोर आली आहे. यामध्ये सोलापूरमधून राम सातपुते, भंडारा-गोंदियामधून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.