लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दरम्यान महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये. दरम्यान अमरावतीच्या जागेवरून अजूनही तिढा सुटताना दिसत नाहीये. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांचा विरोध आहे. त्यातच आता भाजपाने अमरावतीच्या जागेसाठी प्लॅन बी आखला असल्याची चर्चा आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टाततून येणार निकाल.
अमरावतीला भाजपा नवीन उमेदवारांची चाचपणी करत आहे. नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावर १ एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो त्यावर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. नवनीत राणा यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावर १ एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. १ तारखेला निकाल आल्यानंतर महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तर ४ ते ५ एप्रिल दरम्यान नवनीत राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या या चर्चा देखील सुरु आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर निकाल येण्याची शक्यता आहे. जर का हा निकाल राणा यांच्याविरोधात लागला तर भाजपाने आपला प्लॅन बी तयार केला असल्याचे समोर आले आहे. तसेच राणा यांच्याऐवजी कोणाला उमेदवारी देता येईल याबाबत चाचपणी भाजपाने सुरु केली आहे.