ईडीने दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. पीएमएलए कोर्टाने त्यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी आदींची अटक बेकायदेशीर असून, आपली सुटका व्हावी यासाठी केजरीवालांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. लवकरच त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक सूचना दिली आहे. यावेळी केजरीवाल यांनी आरोग्य विभागाबाबत सूचना दिल्या आहेत.
दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केजरीवाल आज कोठडीत असले तरी त्यांना दिल्लीतील लोकांच्या आरोग्याची काळजी आहे. तत्पूर्वी, जलमंत्री अतिशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, केजरीवाल यांनी शनिवारी त्यांना ईडीच्या ताब्यातून पाणी आणि सीवरेजशी संबंधित सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘त्यांच्या सूचनांसह’ एक कागदपत्र पाठवले होते. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांची कन्या के. कविता यांना देखील अटक केली होती. के. कविता या घोटाळ्यामध्ये आरोपी आहेत. दरम्यान न्यायालयाने के.कविता यांना ९ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेविरोधात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दर आम आदमी पक्षाने यंदा होळी साजरी न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. तसेच आम आदमी पक्ष देशभरात केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करत आहे. ईडीने आरोप केला आहे की, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता ही ‘दक्षिण ग्रुप’ चा भाग होती, ज्याने २०१-२२ च्या अबकारी धोरणांतर्गत मद्य व्यवसाय परवान्याच्या बदल्यात दिल्लीच्या सत्ताधारी आम आदमी पार्टीला (AAP) १०० कोटी रुपयांची लाच दिली. हे धोरण आता रद्द करण्यात आले आहे.