लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दरम्यान महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये. दरम्यान अमरावतीच्या जागेवरून अजूनही तिढा सुटताना दिसत नाहीये. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांचा विरोध आहे. त्यातच आता भाजपाने अमरावतीच्या जागेसाठी प्लॅन बी आखला असल्याची चर्चा आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टाततून येणार निकाल. अमरावतीला भाजपा नवीन उमेदवारांची चाचपणी करत आहे. नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावर १ एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो त्यावर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दिलासा मिळाला नाही तर उमेदवार कोण असेल यासाठी भाजपाने चाचपणी सुरु केली आहे.
दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांची कन्या के. कविता यांना देखील अटक केली होती. के. कविता या घोटाळ्यामध्ये आरोपी आहेत. दरम्यान न्यायालयाने के.कविता यांना ९ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान ईडीने केजरीवाल याना देखील या प्रकरणात अटक केली असून, त्यांना pmla कोर्टाने ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी कोठडीविरोधात केजरीवाल यांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे.
आयपीएल सुरू होऊन आतापर्यंत सहा सामने खेळले गेले आहेत. काहींना पराभवाने तर काहींना विजय प्राप्त करून या स्पर्धेची सुरुवात केली आहे. दरम्यान आज दोन नवीन कर्णधार असलेल्या युवा भारतीय खेळाडूंमध्ये सामना रंगणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियम हा सामना रंगणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघ खेळणार आहेत. चेन्नई आणि गुजरातने आपले पहिले सामने जिंकले आहेत.
पाकिस्तान हा देश हा दहशतवाद्यांचा गड समजला जातो. पाकिस्तान भारताविरुद्ध अनेक नापाक कारवाया करत असतो. मात्र दहशतवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानमध्येच आता दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नावाचा प्रांत आहे. त्या ठिकाणी काल रात्री सोमवारी तुरबत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि नौदलाच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पीएनएस सिद्दीकी हा पाकिस्तानचा सर्वात दुसरा मोठा नौदल एअरबेस आहे. चार दहशतवाद्यांनी या एअरबेसवरच हल्ला सुरु केला.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपाने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात देखील भाजपाने २५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. चंद्रपूर मधून विद्यमान आमदार आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सुधीर मुनगंटीवार लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला आहे. भाजपाने मिशन ४५ प्लसची सुरुवात चंद्रपूरमधून केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.