आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (उबाठा) महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर, महाविकास आघाडीतून त्याबाबत विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे सदस्य बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत की, शिवसेनेने (उबाठा) मुंबई दक्षिण मध्य आणि सांगलीसाठी उमेदवार जाहीर करायला नको होते. यावर अजूनही चर्चा सुरू आहे,” “उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आज जाहीर केलेल्या यादीवर काँग्रेस नेते नाराज आहेत. सेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीचा फेरविचार करावा, अशी मी विनंती करतो. काही जागांवर चर्चा सुरू होती आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येकाने उमेदवारांच्या भावनेचे पालन करणे अपेक्षित होते. असे म्हणत थोरात यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने शिवसेने सोबतच्या (उबाठा) जागावाटपाच्या चर्चेचे नेतृत्व करणाऱ्या थोरात यांनी काही जागांवर चर्चा सुरू असतानाच जागांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.दरम्यान शिवसेनेने (उबाठा) मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते अनिल देसाई आणि सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
“सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागांवर चर्चा सुरू होती. अशा स्थितीत उमेदवारांची नावे एकतर्फी कशी जाहीर करता येतील ?. महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल,” असे थोरात म्हणाले आहेत. तसेच सांगलीतील काँग्रेसचे नेते पक्षाच्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला जात असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईत शिवसेनेच्या सोबतच्या (उबाठा) जाहीर झालेल्या जागांवर त्यांनी आपली नाराजी हायकमांडला कळवली आहे.
” उद्धव ठाकरेंच्या पक्षाने घाई करत सांगलीच्या जागेवर आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा सुरू असलेल्या जागांवर एकतर्फी उमेदवार जाहीर करायला नको होते. मुंबईबाबत आम्ही पक्षनेतृत्वाला आमची नाराजी कळवली आहे आणि आमच्या नेतृत्वाच्या सूचनेनुसार आम्ही पावले उचलू,” असे गायकवाड म्हणाल्या आहेत.
काँग्रेस नेते संजय निरूपमही याबाबत संतापले असून त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवसेना (उबाठा) गटाच्या या एकतर्फी भूमिकेचा निषेध केला. आहे.
“शिवसेनेने (उबाठा ) टोकाची भूमिका घेऊ नये, यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होईल. मला काँग्रेस नेतृत्वाला असे सुचवायचे आहे कि याबाबत त्यांनी हस्तक्षेप करावा, नाही तर पक्ष वाचवण्यासाठी युती तोडावी. शिवसेनेसोबत युतीचा निर्णय काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात आणि त्यापलीकडेही जाणवेल”, असे संजय निरुपम यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. .
आज सकाळी शिवसेना (उबाठा ) गटाचे नेते संजय राऊत यांनी एक्सवर 17 लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी शेअर केली होती. ज्यामध्ये . मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, सांगली, हिंगोली, धारशिव, नाशिक आणि मावळ जागा.रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण या मतदारसंघाचा समावेश आहे.
शिवसेना (उबाठा ) गट महाराष्ट्राची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्यासोबत युती करून लढत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात होणार आहे.