दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. तर त्यांना २१ मार्च रोजी त्यांना विशेष कोर्टाने ७ दिवसांची ईडी कोठडी दिली आहे. तर ईडीच्या अटकेविरुद्ध केजरीवालांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान अरविंद केजरीवालांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांना केजरीवालांना आज राउज एव्हेन्यू कोर्टात हजर केले जाणार आहे. केजरीवालां आज कोर्टात हजर करण्यात येणार असल्याने दिल्ली पोलिसांनी संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दिल्ली पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवल्याने कोर्टाच्या बाजूला छावणीचे स्वरूप आहे. जेकरीवालांना कोर्टात हजर करतेवेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता आहे. संपूर्ण शहरात आणि खास करून कोर्ट परिसरामध्ये पोलीस आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. साधारणतः १००० पोलीस तैनात करण्यात आले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या कोर्टातील हजेरीवर पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या एसीपी आणि एसएचओकडे सोपवण्यात आली आहे. यासोबतच आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीशिवाय वाहनांनाही जाऊ दिले जाणार नाही. तपासणी केल्यानंतरच नवी दिल्ली सीमेकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांना जाण्याची परवानगी दिली जाईल. केजरीवाल यांच्या हजेरीच्या पार्श्वभूमीवर आपच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राऊस एव्हेन्यू कोर्ट, भाजप मुख्यालय, एलजी हाऊस, पीएम हाउस, एचएम हाऊस आणि भाजप अध्यक्षांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान कोर्टाने या प्रकरणातील आरोपी असलेल्या के. कविता यांना देखील कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.