लोकसभेचे रणशिंग सर्व पक्षांनी फुंकले आहे. सर्वच पक्ष प्रचार करताना दिसत आहेत. देशात भाजपा आणि इतर विरोधी पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात देखील महायुतीने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र ४५ प्लसचे मिशन ठेवलेल्या महायुतीमध्ये अजूनही सर्व काही ठीक डोसून येत नाहीये. काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्या उमेद्वाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत आपले ८ उमेदवार जाहीर केले आहेत. जागावाटप पूर्ण झाले नसले तर महायुतीच्या वाट्याला १२ ते १३ जागा येण्याची शक्यता आहे. चार ते पाच ठिकाणी शिवसेनेने खासदारांना तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपाने घेतली होती. यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता. तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा आहे.
महायुतीमध्ये हिंगोलीची जागा अधिक वादग्रस्त ठरणार आहे. सध्या तिथे हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेने पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भाजपचा त्यांच्या उमेदवारीला विरोध कायम आहे. हेमंत पाटलांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे. भाजपचा उमेदवार येथे दिल्यास त्याला सहजपणे निवडून आणण्याचा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे. विरोधाची तीव्रता पाहता हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याची चर्चा सुरु असल्याचे समजते आहे.