लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. एक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महावीकस आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. रश्मी बर्वे या रामटेकच्या कॉँग्रेसच्या उमेदवार आहेत. मात्र आता रश्मी बर्वे यांना आणखी एक धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्वही रद्द झाले आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्तांनी जारी केला आहे.
रश्मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या. त्यानंतर काँग्रेसने त्यांना रामटेकमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे बर्वे यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपावर बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढायचे ठरवले होते. मात्र आता जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. रश्मी बर्वे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. रामटेकमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता असा निर्णय आल्याने काय बर्वे आणि मविआ काय करणार याबाबत स्पष्ट झालेले नाही.