लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून हिंगोलीत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता हेमंत पाटील यांची उमेदवारी शिवसेनेकडून रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हिंगोली लोकसभेचा उमेदवार बदलला आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत हेमंत पाटलांचे नाव होते. त्यानंतर त्यांना होणार विरोध वाढत गेला. तेथील स्थानिक भाजपाचा विरोध आणि दबाव यामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. आता हिंगोलीत बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार भावना गवळी या इच्छुकी होत्या. मात्र आता त्यांचा देखील पत्ता आता कट करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशीममध्ये संजय राठोड यांचे नाव चर्चेत होते. मात्र या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता देखील कट झाला आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी भावना गवळीने सर्वस्व पणाला लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्ष बंगल्यावर त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. मात्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांचा नूर पूर्णपणे बदलला होता. तेव्हाच कदाचित त्यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते.