महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो, असे म्हणत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना सूचक इशारा दिला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
“ओसाड गावचे पाटील म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा भांडुपचा देवानंद संजय राऊत… ज्याचे कुटुंब व मालक कोविड भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात आहेत हे कधीही जेलमध्ये जाऊ शकतात” तसेच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे याने स्वतःच्या पैशाने काही घेतलेले नाही नाही. भ्रष्टाचाराने यांचं आयुष्य बरबटलेलं आहे. व्यंकटेश उप्पर आज ही गायब आहे. त्याला राऊतने गायब केला असा आरोप मी केला होता. माणसांना गायब करणं महिलांना शिव्या घालणं अशा चारित्र्याचा माणूस आमच्या नेत्यांवर टीका करतो? लोकांच्या हत्यांनी यांचे हात बरबटलेले आहेत.नरेंद्र मोदी यांच्यावर एक भ्रष्टाचाराचा आरोप मागील 10 वर्षात हे करू शकलेले नाहीत, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
आज सकाळी संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारचे 12 वाजवले, असा उल्लेख केला आहे. त्यावर उत्तर देताना नितेश राणे ज्याने स्वतःच्या मालकांचे तीन तेरा वाजवले आहे. त्याने असे बोलावे म्हणजे 2024 मधला मोठा विनोद आहे. असे म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधले नाचे आहेत असे म्हंटले होते. या विधानाला प्रत्युत्तर करताना ” काँग्रेसच्या कोठ्यावर नाचणाऱ्या बाजारू दलालांनी दुसऱ्यांना नाचा बोलू नये. ज्याचा स्वतःचा अस्तित्व नाही त्याने अशी हिंमत करू नये. याचे उत्तर आम्ही उत्तर 4 जून ला देऊ तेव्हा कोणी कसा वचपा काढला ते समजेल”.असा इशाराही नितेश राणे यांनी ठाकरे गटाला दिला आहे.