भाजप पक्षाच्या 44 व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचा “भारताचा पसंतीचा पक्ष” असा उल्लेख केला आहे.पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपने नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीदवाक्य घेऊन देशाची सेवा केली आहे.
आज एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, “आज, @BJP4India च्या स्थापना दिवसानिमित्त, मी संपूर्ण भारतातील सर्व पक्षकार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. वर्षानुवर्षे आमच्या पक्षाची उभारणी करणाऱ्या त्या सर्व महान महिला आणि पुरुषांचे परिश्रम, संघर्ष आणि बलिदान.यांचेही मी आदरपूर्वक स्मरण करत. मी मोठ्या विश्वासाने सांगू शकतो की आम्ही भारताचा पसंतीचा पक्ष आहोत, ज्याने नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम केले आहे.”
“@BJP4India ने आपला विकासाभिमुख दृष्टीकोन, सुशासन आणि राष्ट्रीय मूल्यांशी बांधिलकीचा ठसा उमटवला आहे ही आनंदाची बाब आहे. आमच्या कार्यकर्त्यांद्वारे समर्थित, आमचा पक्ष 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना मूर्त रूप देतो. भारतातल्या तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करू शकणारा आणि 21व्या शतकात भारताला नेतृत्व प्रदान करणारा पक्ष म्हणून आमच्या पक्षाकडे पहिले जाईल असे मोदींनी पुढे म्हंटले आहे.
सुशासन आणि समाजातील गरीब आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याबद्दल पक्षाचे कौतुक करताना पंतप्रधानांनी जातीवाद आणि जातीयवाद दूर करण्यात भाजपच्या योगदानाचा उल्लेख केला.
पंतप्रधान म्हणाले, “केंद्रात असो किंवा राज्यांमध्ये, आमच्या पक्षाने सुशासनाची नव्याने व्याख्या केली आहे. आमच्या योजना आणि धोरणांमुळे गरीब आणि दलितांना बळ मिळाले आहे. अनेक दशकांपासून मार्जिनवर राहिलेल्यांना आमच्या पक्षात एक आवाज आणि आशा मिळाली आहे. आम्ही सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे”,
“आमच्या पक्षाने भारताला भ्रष्टाचार, वंशवाद, जातिवाद, जातीयवाद आणि मतपेढीच्या राजकारणापासून मुक्त केले आहे, जे देशावर प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्यांचे वैशिष्ट्य असते . आजच्या भारतात स्वच्छ आणि पारदर्शक कारभारावर भर दिला जात आहे. विकास कोणत्याही भेदभावाशिवाय गरिबांपर्यंत पोहोचेल यांची मला खात्री आहे.
शेवटी, पंतप्रधानांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला आणि सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी लोकांनी आपल्या पक्षावर विश्वास ठेवावा आणि आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली.
“भारत नवीन लोकसभा निवडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मला विश्वास आहे की जनता आम्हाला आणखी कार्यकाळ देईल जेणेकरून आम्ही गेल्या दशकात उभे केलेले काम आणखी वेगाने पुढे नेऊ शकू. .त्यासाठी आमचे कार्यकर्ते लोकांमध्ये काम करत आहेत आणि आमचा अजेंडा विस्तृत करत आहेत,” असे पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
6 एप्रिल 1980 रोजी स्थापन झालेला भाजप सध्या जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाची उत्पत्ती भारतीय जनसंघापासून झाली आहे, जी 1951 मध्ये डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केली होती.