आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यादरम्यान . दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. आज मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी संपत होती.
या प्रकरणात आरोपी आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हेही न्यायालयात हजर झाले. संजय सिंगची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे.. या प्रकरणातील आरोपी सर्वेश मिश्रा याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणेने सिसोदिया यांना 9 मार्च रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती. यानंतर 10 मार्च रोजी सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने कोर्टाकडे सिसोदिया यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्र्यांना 17 मार्चपर्यंत (7 दिवस) कोठडी सुनावली होती. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने त्यांना 8 तासांच्या चौकशीनंतर दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती.