लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहरानपूर येथील विशाल जनसभेला संबोधित केले . यावेळी त्यांनी इंडी आघाडीसह राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टीका करताना मोदींनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतील अयशस्वी आघाडीचा उल्लेख केला.
सहरानपूर येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”मी पहिलीच निवडणूक अशी पाहत आहे की, जिथे विरोधक निवडणूक जिंकण्यापेक्षा भाजपाला ३७० आणि एनडीएला ४०० च्या आतमध्ये रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक तासाला उमेदवार बदलावा लागत आहे, अशी स्थिती समाजवादी पक्षात आहे. आपल्या बालेकिल्ल्यात देखील काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीयेत. दोन जणांचा पिक्चर मागच्या वेळेस फ्लॉप झाला आहे. पुन्हा यावेळी तोच पिक्चर यांनी रिलीज केला आहे.”
उत्तर प्रदेशातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने करार केल्यावर जवळपास अनेक वर्षांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी फेब्रुवारीत आग्रा येथे रोड शो केला होता. मात्र त्यांना यश मिळाले आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत अब की पार ४०० पार असा नारा एनडीए सरकारने दिला आहे. त्यासाठी भाजपा व मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अत्यंत बारकाईने निवडणुकीवर लक्ष ठेवून असल्याचे पाहायला मिळते आहे.