लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपली आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९ नावांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ७ नावांची घोषणा करण्यात आली आहे. चंदीगडमधून किरण खेर यांचे तिकीट कापून संजय टंडन यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय रिटा बहुगुणा जोशी यांचे तिकीट रद्द करून अलाहाबाद मतदारसंघातून नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
चंदीगडमध्ये किरण खेर या दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने किरण खेर यांचे तिकीट कापले आहे. भाजपाने आज जी यादी जाहीर केली आहे. त्यातील ९ जागांपैकी भाजपने मागच्या निवडणुकीत ७ जागांवर विजय प्राप्त केला होता. मात्र यापैकी मछलीनगर आणि कौशांबी या दोनच जागांवर विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. आतापर्यंत भाजपाने देशभरात आपले ४२० पेक्षा जास्त लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ८० पैकी ७४ जागा लढवत आहेत. ६ जागा भाजपाने मित्रपक्षांना दिल्या आहेत.