पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या उत्साहात असलेल्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो मतदारांना धमकावताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला मतदान न करणाऱ्यांना निवडणुकीनंतर धडा शिकवण्याचा इशारा तो देताना दिसत आहे. निवडणुकीनंतर केंद्रीय दल निघून गेले तर आमच्यापासून तृणमूल काँग्रेस) कोण वाचवेल, असेही तो म्हणत आहे. याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
त्याचा हा व्हिडीओ एक दिवस अगोदरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही तूर्त मौन बाळगलेले दिसत आहे. भाजपचे पश्चिम बंगालमधले नेते राहुल सिन्हा म्हणाले की, हा व्हिडिओ निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे.
वास्तविक, उत्तर दिनाजपूरच्या चोपडा येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदुल रहमान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते भाजपच्या तसेच इतर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत आणि केंद्रीय फोर्स निघून गेल्यास बघू कोण वाचवणार असे म्हणत आहेत. जे तृणमूलला मतदान करणार नाहीत त्यांनी हे ऐकून ठेवा. असे रहमान म्हणताना दिसत आहे.