लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही रसिदखेच पाहायला मिळते आहे. मात्र सध्या राज्याच्या राजकारणात गांधी-आंबेडकर वाद पुन्हा एकदा सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीची जागवतापची बोलणी मविआ सोबत फिस्कटली. त्यानंतर वंचितने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. नी मविआच्या उमेदवारांच्या विरोधातही उमेदवारही उभे केले आहेत. तर, काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे. वंचितच्या या भूमिकेवर महात्मा गांधी यांचे परंतु तुषार गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. वंचित आणि एमआयएमला मतदान करू नका असे आवाहन तुषार गांधी यांनी केले आहे.
वंचित बहुज आघाडीने माविआ उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहे. त्यांच्या या भूमिकेचा तुषार गांधी यांनी समाचार घेतला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेने तर भाजपलाच फायदा होणार आहे ना असे म्हणत वंचित आणि MIM ला मतदान करू नका असे आवाहन तुषार गांधी यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकर-गांधी यांच्यातील वादाला राज्यात सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीला, वंचित बहुजन अगदी आणि एमआयएमला मतदान करू नये असे आवाहन गांधी यांनी केले आहे. त्यामुळे निवडणुकीत त्याचा कितपत परिणाम होतो ते ४ जून रोजी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.