उबाठाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची उत्तर प्रदेश येथील 200 एकर जमीन आयकर विभागाने जप्त केली असल्याची बातमी समोर आली आहे. श्रीधर पाटणकर यांचे निकटवर्तीय हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांनी खरेदी केलेली ती जमीन होती.तसेच या जमिनीवर 800 कोटींचा प्रकल्प उभा राहणार होता . पण मग एवढी रक्कम कुठून पुरवली जात होती?असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत जाब विचारला आहे.
प्राप्तिकर विभागाने (IT) ठाकरे कुटुंबाचे कथित बेपत्ता भागीदार नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनऊ येथील सुमारे 200 एकर जमीन जप्त केली आहे.किरीट सोमय्या यांनी हे चतुर्वेदी हवाला ऑपरेटर असल्याचा आरोप केला असून, या प्रकरणी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्युत्तर मागितले आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे व त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली होती . त्या दरम्यान त्यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पातील 11 फ्लॅट जप्त करण्यात आले होते. श्रीधर पाटणकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मनी लॉंडरिंगच्या एका प्रकरणात करण्यात आली होती.