लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभर प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान एक दोन दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसवर आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली होती. काँग्रेस महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका त्यांनी केली होती. आजच्या राजस्थानच्या सभेत देखील त्यांनी याचा पुनरुच्चार केला. आज येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या भाषणाने संपूर्ण काँग्रेस आणि इंडिया आघाडीत खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”परवा मी माझ्या भाषणात ९० सेकंद या वेळेत देशासमोर एक सत्य मांडले होते. त्यामुळे संपूर्ण काँग्रेस आणि इंडिया आघाडीत भीतीचे वातावरण आहे. तुमची संपत्ती हिसकावून आपल्या खास लोकांना वाटून देण्याचे काँग्रेस कटकारस्थान रचत आहे, हे सत्य मी देशासमोर ठेवले होते. मी त्यांची व्होट बँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण उघड केले. शेवटी, काँग्रेसला सत्याची इतकी भीती का वाटते?”
एकता ही राजस्थानची सर्वात मोठी पुंजी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा-जेव्हा आपली फाळणी झाली, त्याचा फायदा देशाच्या शत्रूंनी घेतला आहे. आताही राजस्थान आणि तेथील लोकांमध्ये फूट पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, राजस्थानने यापासून सावध राहण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की परवा राजस्थानमध्ये मी काही सत्य देशासमोर ठेवले आणि संपूर्ण काँग्रेस आणि इंडिया आघाडीत भीती पसरली आहे. तुमची संपत्ती हिसकावून त्यांच्या खास लोकांना वाटून देण्याचे काँग्रेस एक खोल षडयंत्र रचत आहे हे सत्य मी ठेवले आहे. जेव्हा मी त्यांचे हे राजकारण उघड केले तेव्हा ते इतके चिडले की त्यांनी मोदींना सर्वत्र शिव्या द्यायला सुरुवात केली.