ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) हे बऱ्याचदा आपल्या वक्तव्यामुळे त्यांच्याच पक्षाला अडचणीत आणतात. त्याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला. “अमेरिकेत, वारसा कर आहे. जर एखाद्याकडे 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असेल आणि जेव्हा तो मरण पावला तेव्हा तो फक्त 45 टक्केच त्याच्या मुलांना हस्तांतरित करू शकतो, 55 टक्के सरकार बळकावते. हा चांगला कायदा आहे. जो तुम्हाला सांगतो की, तुमच्या पिढीत, संपत्ती निर्माण केली आणि आता तुम्ही जात आहात, तुम्ही तुमची संपत्ती जनतेसाठी सोडली पाहिजे, ती सर्व नाही, पण अर्धी तरी ,हा एक धोरणात्मक मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास एक धोरण तयार करेल ज्याद्वारे संपत्तीचे वितरण अधिक चांगले होईल”. असे वक्तव्य पित्रोदा यांनी केले आहे.
भाजपकडून या पित्रोदा यांच्या या वक्त्यव्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आज याबाबत पित्रोदा यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की, “काँग्रेसने निर्णय घेतला आहे. भारताचा नाश करायचा .”
X वरील एका पोस्टमध्ये अमित मालवीय म्हणाले, “काँग्रेसने भारताला नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता, सॅम पित्रोदा संपत्तीच्या पुनर्वितरणासाठी 50 टक्के वारसा कराची वकिली करत आहेत. याचा अर्थ आम्ही जे काही बांधतो, त्यातील 50 टक्के, आमच्या सर्व कष्टाचे आणि उद्योगाचे ५० टक्के काढून घेतले जातील, त्याशिवाय आम्ही जो कर भरतो, तोही काँग्रेसचा विजय झाल्यास वाढेल.असा याचा अर्थ आहे.
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनवाला यांनीही काँग्रेसवर टीका केली की, या पक्षाला लोकांची कष्टाची संपत्ती बळकावायची आहे.
” गांधी वड्रा कुटुंबाचे सर्वात जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांच्या माध्यमातून, काँग्रेस असे म्हणत आहे की तुम्ही जे कमावता त्यातील 55% तुमच्या मृत्यूनंतर काढून घेतला जाईल. जर तुम्ही शेतकरी असाल- तर तुमच्या जमिनीपैकी 55% जमीन घेतली जाईल. व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायातील 55% तुमच्या बचतीपैकी 55% तुम्ही तुमच्या मुलांसाठी ठेवल्या जातील, गंमत म्हणजे गांधींनी त्यांच्या स्वत:च्या मुलांसाठी आणि जावयांसाठी मोठा खजिना ठेवला आहे आता त्यांना तुमची मेहनतीने कमावलेली संपत्ती बळकावयाची आहे. ,” पूनावाला म्हणाले.
काँग्रेसनं मात्र पित्रोदा यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेतली आहे. “. पित्रोदा जे म्हणाले, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, ती काँग्रेस पक्षाची भूमिका नाही असं काँग्रेसने म्हंटले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तसं ट्विट देखील केले आहे. जयराम रमेश म्हणाले आहेत की,” सॅम पित्रोदा हे माझ्यासह अनेकांचे गुरू राहिलेले आहेत. पित्रोदा हे त्यांची मतं मोकळेपणानं व्यक्त करत असतात. पण त्यांच्या प्रत्येक मताशी काँग्रेस सहमत असेलच असं नाही”.
तर काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की , “काँग्रेस असे धोरण आणणार असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे का ? तसेच प्रत्येकाला वेगवेगळ्या कल्पना आणि मुद्द्यांवर चर्चा करण्याचा अधिकार आहे असे म्हणत त्यांनी पित्रोदा यांच्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
भारतात, वारसा हक्कावर कर आकारण्याची संकल्पना सध्या अस्तित्वात नाही. खरं तर, 1985 पासून वारसा किंवा मालमत्ता कर रद्द करण्यात आला होता