लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून मतदारांना आवाहन केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1783666704591048835
पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, ”आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व जागांच्या मतदारांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी विक्रमी मतदान करावे. जितके जास्त मतदान होईल तितकी आपली लोकशाही मजबूत होईल. आमच्या तरुण मतदारांना तसेच देशातील महिला शक्तींना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने मतदानासाठी पुढे यावे. तुमचे मत तुमचा आवाज!”
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. तिरुवनंतपुरममधून ते काँग्रेसचे शशी थरूर यांच्याशी निवडणूक लढवत आहेत. रामायण मालिकेतील अभिनेने अरुण गोविल, अभिनेत्री हेमा मालिनी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तेजस्वी सूर्या आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हेही रिंगणात आहेत.