लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. हा निर्णय होण्याआधी गुजरात आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का अशी टीका केली जात होती. कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत होणार आहे.
कांदा निर्यात करताना शेतकऱ्यानं चांगला दर मिळू शकतो. पंतप्रधान आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्याआधीच राज्यातील शेतकर्याना दिलासा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवून ६ देशांमध्ये निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेश, युएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांमध्ये निर्यात करता येणार आहे.