लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने राज्यातील कांदा निर्यातबंदी उठवली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. ही निवडणूक ग्रामपंचायत, विधानसभेची नाही. देशाची निवडणूक आहे. पुढील ५ वर्षे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील याची ही निवडणूक असल्याचे फडणवीस म्हणाले.
कोल्हापुरात सभा झाली पाहिजे ही लोकांची मागणी होती. पंतप्रधान मोदींची सभा कोल्हापुरात होत आहे याचा आनंद होत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत विरोधकांना काही पडलेले नाही. आपल्या हातातून आणखी एक मुद्दा गेल्याचे त्यांना दुःख आहे. याशिवाय बोलताना माध्यमांनी त्यांना संजय राऊतांबाबत विचारले असता फडणवीसांनी कोण संजय राऊत ? असा सवाल त्यांनी विचारला.
दरम्यान राज्यात बारामती नंतर माढा आणि सोलापूरची निवडणूक महायुतीची धाकधूक वाढविणारी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमधील इतर पक्षांची साथ देखील मिळणार आहे. मात्र यंदाची स्थिती थोडीशी विचित्र आहे. भाजपा सहज जिंकले असे वाटत असताना शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या बाजूला वळल्याने आता येथील राजकारण बदलले आहे. दरम्यान या जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या शिलेदारांवर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माढ्यात आमदार प्रसाद लाड आणि सोलापुरात श्रीकांत भारतीय यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोघेही ७ मे पर्यंत सोलापूर आणि माढ्यात तळ ठोकून बसणार आहेत. यामध्ये प्रचाराची आणि इतर गोष्टींचे नियोजन केले जाणार आहे.