पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील कसबा परिसरात भाजप महिला नेत्या सरस्वती सरकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी अखेर नरमाईची भूमिका घेतली आहे. भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण कोलकाता येथील उमेदवार देवश्री चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी आता हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगालचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी ही माहिती दिली आहे. “
“कसबा (दक्षिण कोलकाता) येथे सततच्या निदर्शनांनंतर, कोलकाता पोलिसांनी अखेर माघार घेतली,” , सरस्वती सरकार, भाजप मंडल अध्यक्ष आणि इतर भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या स्थानिक TMC नगरसेवक सुशांत गोश यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई आणि अजामीनपात्र आरोप लावण्याचे आश्वासन दिले.असे म्हणत अमित मालवीय यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर लिहिले आहे की त्यांना (पोलिसांना) आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात भाजप मंडळाच्या अध्यक्षा सरस्वती सरकार आणि इतर भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करावा लागला. ममता बॅनर्जींना खूश करण्यासाठी कोलकाता पोलिस कोणत्या प्रकारचे राजकीय दबावाखाली आहेत हे यावरून दिसून येते.”
कोलकाता पोलिसांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा, देत अमित मालवीय यांनी म्हटले आहे की कोलकाता पोलिसांनी आपल्या वचनबद्धतेचे पालन केले नाही तर आम्ही निवडणूक आयोगाशी संपर्क साधू आणि न्यायालयात जाऊ. ह्या लढाईचा निकाल लागायलाच हवा, तृणमूलला जावे लागेल. बंगाल यापुढे असे हिंसाचाराचे राजकारण सहन करू शकत नाही.
भाजपनेत्या सरस्वती सरकार या पक्षाच्या खासदार देबश्री चौधरी यांच्या प्रचारात असातना शनिवारी रात्री त्यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पश्चिम बंगालच्या कोलकाता दक्षिण लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कसबा येथील अनादापूर परिसरात ही घटना घडली. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली, त्यानंतर त्यांना रुबी स्टेट जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.याप्रकरणी आनंदपूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही रविवारी सरस्वती सरकार यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर कोलकात्यात हिंसाचाराची ही परिस्थिती असताना उर्वरित बंगालमध्ये किती दयनीय परिस्थिती असेल याची कल्पना करता येईल, असे इराणी म्हणाल्या आहेत. .
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या रूपात असलेले गुंड संदेशाखाली हिंसाचार सारख्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहेत. तर काही नागरिकांना मत देण्यासाठी धमकावताना दिसत आहेत. तसेच.या वर्षी मार्चमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधितांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याच्या सुमारे पाच घटनांची नोंद झाली आहे.