लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. महायुतीने पुण्यात मुरलीधर मोहोळ, मावळमध्ये श्रीरंग बारणे, बारामतीमधून सुनेत्रा पवार आणि शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिले आहे. ७ आणि १३ मे ला या जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान आजच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली.
पुण्यातील रेसकोर्स मैदानावर झालेल्या सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदीं म्हणाले, ”धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करणारे लोक , आज धर्माच्या नावावर एससी, एसटी, ओबीसी आणि ज्यांना संविधान आणि संसदेच्या माध्यमातून मिळालेले आहे. आता हे लोक त्यातून काढून मुसलमानांना देण्याचे नियोजन करत आहेत. त्यांनी कर्नाटकला याचे मॉडेल म्हणून विकसित केले आहे. कर्नाटकात एक फतवा काढत सर्व मुसलमानांना ओबीसी करून टाकले. याबतचे सर्क्युलर काढले. त्यामुळे सर्व मुसलमान देखील ओबीसींना २७ टक्के असणाऱ्या आरक्षणत आले. ओबीसी समाजाला त्रास दिला. इंडी आघाडीवाल्यानो कान उघडून ऐका मोदी अजून जिवंत आहे. मी युवराजांना सांगू इच्छितो जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण होऊन देणार नाही. असे मनसुबे असणाऱ्यांना हा देश राजकारणाच्या पटलावरून मिटवून टाकेल.”
दरम्यान भाजपाने पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देशासह राज्याच्या जनतेचे लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे लागले आहे.