Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home संस्कृती

मुलगी सून यांच्यात भेदभाव करणा-यांना जनताच  धडा शिकवेल – मुख्यमंत्री शिंदे 

param by param
May 2, 2024, 03:40 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आपल्या सरकारने महिलांचा सन्मान वाढवणारे अनेक निर्णय घेतले. एसटीमध्ये 50 टक्के सवलत, महिलांना स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट, केंद्राची लखपती दीदी, उज्वल्ला योजना, जनधन योजना अशा योजना सुरु केल्या. आजपासून माता भगिनींशीसंबधित एका ऐतिहासिक निर्णयाची राज्यात अंमलबजावणी सुरु झाली. शासकीय कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावात आधी आईचे नाव नंतर वडीलांचे नाव लावले जाणार आहे. आपले सरकार मुलगी, सून, पत्नी असा कोणताही भेदभाव करत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. भोर येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  बोलत होते.

ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नाही. ही निवडणूक विकासाची आहे. ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे, असे ते म्हणाले. काही लोक निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन शिंदेनी  उपस्थितांना केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझा प्रत्येक मिनिट राज्याच्या विकासासाठी समर्पित आहे. मी गावी हेलिकॉप्टरने जातो, तिथे शेती करतो त्यावर टिका होते. पण शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे अजूनही पचनी पडलेले नाही, त्यांना पोटदुखी झाल्याने असे बेछूट आरोप केले जातात, अशी टिका त्यांनी उबाठावर केली.

भोरची जनता सूज्ञ आहे. त्यामुळे महिला भगिनींचा सन्मान करणाऱ्या महायुतीलाच मतदान करेल. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदीजींनी जे काम केले ते ६० वर्षांमध्ये झाले नाही. जरा गरम झाले की परदेशात पळणारे लोक देशाची काय प्रगती करणार, अशी टिका मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

आपले सरकार येण्यापूर्वी राज्यात नकारात्मकता होती. सण उत्सवांवर बंदी होती. मेट्रो कारशेड, समृद्धी हायवे अशा मोठ्या प्रकल्पांना रोखले होते. आम्ही उठाव केला. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन सर्वसामान्यांना  न्याय देणारे सरकार स्थापन केले. आज उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती मिळत आहे. महायुतीचे सरकार तरुणांच्या हाताला रोजगार देणारे आहे.

मुंबई-पुणे हायवे बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला. केवळ अडीच तासात मुंबईतला माणूस पुण्यात पुण्यातला माणूस मुंबईत जातो. हिंजवडी सारख्या भागांमध्ये आयटी पार्क झाले. ऑटोमोबाइल इंडस्ट्री आली, सर्विस इंडस्ट्री, रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी दिसून आली. एक रस्ता काय करु शकतो हे मुंबई-पुणे एक्सप्रेसने दाखवून दिले. आपण त्यात एक मिसिंग लिंक करतोय. पुणे रिंग रोड करतोय, यात शेतकऱ्यांना कुठलीही अडचण असेल तर ती सोडवायला 24 तास काम करणारे सरकार तत्पर  आहे, असे ते म्हणाले.

*मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले*

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समजाला आरक्षण दिले. ते हायकोर्टामध्ये टिकले परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये अरक्षण रद्द झाले. आपले सरकार जे होणार असेल तेच बोलणारे आहे, जे होणार नाही ते बोलणार नाही. खोटी आश्वासन आपण कधी दिली नाही आणि देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आताही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हायकोर्टाने आक्षेपाची याचिका फेटाळली. पुढे कोर्टात हे आरक्षण टिकेल, असा विश्वास शिंदेनी यावेळी  व्यक्त केला.

Tags: ajit pawarbhoreknath shindeloksabha electionssunetra pawar
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.