लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये महायुतीने ४५ पेक्षा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी अखेर उमेदवारी महायुतीने जाहीर केली आहे. कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व ठाण्यातून नरेश म्हस्के यांनी निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोठे शक्तिप्रदर्शन या दोघांकडून करण्यात आले.