देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
नमस्कार, मी तेजस भागवत. ऋतं मराठीमध्ये एकल्या सर्वांचे स्वागत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसकडून श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. संजय मंडलिक हे दोन ते अडीच लाख मतांनी तर, श्रीमंत शाहू महाराज हे तीन लाख मतांनी विजयी होतील असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
महायुतीकडून कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागा शिवसेनेला सुटल्या आहेत. तर महाविकास आघाडीने कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे तर हातकणंगलेची जागा ठाकरे गटाला सुटली आहे. चंदगड तालुक्यातून संजय मंडलिक यांना १ लाख इतके मताधिक्य मिळेल असे वक्तव्य केले. तर शाहू महाराजांना या ठिकाणावरून ५० हजारांचे मताधिक्य मिळेल असे काँग्रेसमध्ये प्रवेश करताना अप्पी पाटील यांनी सांगितले. ते जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राहिले आहेत.
यंदाच्या निवडणुकीत कागल तालुका महत्वाचा ठरेल. संजय मंडलिक हे याच तालुक्यातील आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, आणि संजय मंडलिक हे तीन तागडे नेते याच तालुक्यातील आहेत. त्यामुळे या तालुक्यातून सव्वा लाखाचे मताधिक्य मंडलिक यांना मिळेल असे मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. मात्र या भागात शाहू महाराजांचे वर्चस्व जास्त असल्याचे म्हटले जात आहे. दोन्हीकडून आपला उमेदवार लाखांच्या मताधिक्याने जिंकणार असे दावे प्रतिदावे केले जात आहेत. महायुतीने मान द्या गादीला नी मत मोदींना असा नारा देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत दिला आहे. तर शाहू महाराज यांचा विजय नक्की होईल असे महाविकास आघाडीने आत्मविश्वासाने दिला आहे. शाहू महाराज यांच्या प्रचाराची मुख्य धुरा सतेज पाटलांकडे आहे. त्यामुळे फडणवीसांनी दिलेला नारा यशस्वी ठरतो की कोल्हापूरची जनता गादीला मतदान करणार हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर दक्षिण व उत्तर भागात महाविकास आघाडीचे आमदार आहेत. तर राधानगरी, भुदरगड, कागल व चंदगड या मतदारसंघात काँग्रेसला दुय्यम नेतृत्वावर अवलंबून राहावे लागणार आहे. गडहिंग्लज मध्ये सतेज पाटील, संभाजीराजे व मालोजीराजे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग येथे आहे. या भागात महायुतीची जागा जास्त असल्याने काँग्रेसला किती खूप कष्ट करावे लागणार आहेत.