लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. दरम्यान देशभरात सर्व पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका लावला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान आज नरेंद्र मोदी गुजरातमधील एका सभेला संबोधित केले. नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (2 मे) आणंदमधील वल्लभविद्यानगर येथील शास्त्री नगर येथे निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. गरिबी, मुस्लीम तुष्टीकरण, आरक्षण आणि संविधान या मुद्द्यांवर काँग्रेसची कोंडी केली.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ”इंडिया आघाडी लोकांना व्होट जिहादसाठी भडकवत आहे. भारतीय आघाडीने मुस्लिमांना एकजुटीने मतदान करण्यास सांगितले आहे. लव्ह जिहाद आणि लँड जिहादनंतर आता व्होट जिहादची हाक देण्यात आली आहे. हा जिहाद कोणाच्या विरोधात चालवला जातो हे तुम्हा सर्वांना चांगलेच माहीत आहे. मोदी म्हणाले की, भारत आघाडीने लोकशाहीच्या उत्सवात मत जिहादचे बोलून लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने विरोध केला नसून, त्यांनी याला मूक संमती दिली आहे. हे मत जिहाद काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणालाही पुढे नेणारा आहे.”
मोदी पुढे म्हणाले, ”एक महिन्याआधी काँग्रेसचे युवराज म्हणाले होते की शक्ती चा नाश करू. आम्ही शक्तीचे उपासक आहोत. शक्तीचे भक्त युवराजांना माफ करू शकतात का? काँग्रेस तुष्टीकरणासाठी किती खालच्या पातळीवर जाणार आहे? आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचे सत्य बाहेर आल्याने काँग्रेस पक्षच संतुलन बिघडले आहे. दरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील मोदी टीका करताना दिसत आहे. तर धार्मिक आधारावर आरक्षण लागू होऊन देणार नाही असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.