लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान देशभरात २ टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतंच काँग्रेसला एकापेक्षा अनेक झटके बसत आहेत. सुरत, इंदोर आणि ओडिशामधील पुरी येथील काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतल्याने तिथे काँग्रेसची अडचण निर्माण झाली आहे. त्यातच पक्षाला मोठी गळती लागलेली दिसत आहे. आता दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे पूर्व प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांच्यासह काँग्रेस पार्टीचे अनेक दिग्गज नेते शनिवार भारतीय जनता पार्टी (भाजपा) मध्ये सहभागी झाले आहेत. शनिवारी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री सरदार हरदीप सिंह पुरी, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांच्या उपस्थितीमध्ये अरविंदर सिंह लवली यांनी , पूर्व मंत्री राज कुमार चौहान, पूर्व विधायक नसीब सिंह आणि नीरज बसोया, पूर्व काँग्रेसचे युवा अध्यक्ष अमित मलिक यांच्यासह भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अरविंदर सिंग लवली म्हणाले की, त्यांना पक्षाच्या बॅनरखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जनतेसाठी लढण्याची संधी मिळाली आहे. देशात भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करत आहे, यात शंका नाही. येत्या काही दिवसांत दिल्लीतही भाजपचा झेंडा फडकणार आहे.