आज मध्यप्रदेशातल्या धार इथे जनसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला त्याचबरोबर देश ‘फिर एक बार मोदी सरकार’च्या बाजूने निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे.
इंडिया आघाडीवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की निवडणूकीच्या पहिल्या टप्यातच त्यांचा पराभव झाला होता.दुसऱ्या टप्प्यात त्यांचा नाश झाला आणि आता तिसऱ्या टप्प्यात या इंडिया आघाडीचे जे काही उरले आहे ते आजच्या तिसऱ्या टप्प्यात पूर्ण साफ केले जाईल.आणि संपूर्ण देश पुन्हा ‘फिर एक बार मोदी सरकार’ साठी मतदान करेल.”
सभेला शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांचे कौतुक करताना पीएम मोदी म्हणाले, “तुम्हा सर्वांना तुमच्या पारंपरिक पोशाखात पाहून मला आनंद झाला आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला दिसणारा आनंद आणि तुम्ही जो आनंद साजरा करत आहात त्यातून संपूर्ण देशाचा आनंद प्रतिबिंबित होतो आहे.
“एक जबाबदार नागरिक म्हणून माझे मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी आधी माझ्या गृहराज्याला (गुजरातला ) भेट दिली. मतदान केल्यानंतर मी इथे येऊन पोचलो . मी नेहमी म्हणत आलो की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे. त्यात भाग घ्या आणि आपला सक्रिय सहभाग नोंदवा, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत.
मध्य प्रदेशातील नऊ लोकसभा जागांसाठी – मुरेना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, भोपाळ, राजगढ आणि बैतुल यांच्यासाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.
तर धार येथे चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, जे 18 व्या लोकसभेसाठी राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा असेल.13 मे रोजी देवास, उज्जैन, मंदसौर, रतलाम, इंदूर, खरगोन आणि खंडवा या सात मतदारसंघांसह मतदान होणार आहे.