उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणूक ऐन भरात असताना उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी पक्षसंघटनेत महत्वाचे बदल केले आहेत. मंगळवारी त्यांचा भाचा आकाश आनंद याला राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आणि तसेच त्याच्याकडून आपले राजकीय उत्तराधिकारी पदही काढून घेतले आहे
मायावती म्हणाल्या की त्या पक्षाच्या “मोठ्या हितासाठी” निर्णय घेत आहेत आणि आनंद याला “पूर्ण परिपक्वता” येईपर्यंत पदांवरून काढून टाकले जात आहे.
“बसपा हा एक पक्ष असण्यासोबतच बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या स्वाभिमानाची आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे ज्यासाठी कांशीराम जी आणि मी आमचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे आणि ही एक अशी चळवळ आहे. त्याला गती देण्यासाठी पिढीही तयार केली जात आहे,” असे मायावती यांनी X वर सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
पक्षातील इतर लोकांना पदोन्नती देण्याबरोबरच, मीआकाश आनंद यांना राष्ट्रीय संयोजक आणि उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते , परंतु पक्ष आणि चळवळीच्या व्यापक हितासाठी त्यांना या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर केले जात आहे.” असे मायावती म्हणाल्या आहेत.
“तर आकाश आनंद यांचे वडील आणि मायावती यांचे बंधू आनंद कुमार हे पूर्वीप्रमाणेच पक्ष आणि चळवळीतील जबाबदारी पार पाडत राहतील. तसेच बसपचे नेतृत्व पक्ष आणि आपल्या चळवळीच्या हितासाठी सर्व प्रकारचा त्याग करण्यास मागेपुढे पाहणार नाही असे मायावती पुढे म्हणाल्या आहेत.
काही उत्तर प्रदेशातील सीतापूर पोलिस ठाण्यात आकाश आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान त्यांनी भाजप सरकारची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांची प्रचार रॅलीची परवानगी देखील काढून घेतली होती.मायावती यांच्या तडकाफडकी घेतलेल्या भूमिकेमागे कदाचित हे कारण असेल असा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.