लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्पातला प्रचार शेवटाकडे येऊन पोचलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यात येत्या शुक्रवारी १० मे रोजी संध्याकाळी ६ वाजता सारसबागेच्या जवळच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ही सभा होणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
यावेळी ते म्हणाले की , “पुणेकर मतदार राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असतात.पुण्यात मनसेला मानणारा मोठा मतदार संघ आहे. मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये मोहोळ यांच्या प्रचारासाठी उतरले आहे. त्यांची ही सभा यशस्वी होण्यासाठी सर्व जण काम करत आहे. तसेच या सभेला चांगलीच गर्दी होईल अशा विश्वास बाळगतो”.
या सभेच्या नियोजनासाठी साठी मनसे कार्यालयात मनसे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत मनसेचे येते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजेश पांडे, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, अजय शिंदे, मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर आणि इतर नेते उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला पाठिंबा दिला आहे. . त्यानंतर भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांनी राज ठाकरेंना सभेसाठी विनंती केली होती. राज ठाकरे यांनी नारायण राणेंचा विनंतीला मान देत कणकवली येथे सभा घेतली होती.यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राज ठाकरेंनी नारायण राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, राज ठाकरे आता महायुतीसाठी सभांचा धडाका लावणार असल्याचे दिसून येत आहे.