“अमेरिकन काका रंगाच्या आधारावर लोकांना शिवीगाळ करतात,” असे म्हणत वारंगळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पित्रोदा यांचा विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.”आज मी खूप रागात आहे. मला शिवी दिली, मी सहन केलं. पण शहजादे म्हणजे राहुल गांधीच्या सल्लागाराने जे म्हटलं, त्याने मला राग आलाय. हा माझ्या देशातील लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान आहे” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पित्रोदा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या “वर्णद्वेषी वक्तव्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.एका मुलाखतीत पित्रोदा यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागातले लोक कसे दिसतात? याची परदेशी लोकांबरोबर तुलना केली होती, “भारत विविधतेने भरलेला देश आहे, जिथे पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात. पश्चिमेकडचे लोक अरबी वाटतात. उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन्ससारखे वाटतात. दक्षिणेकडचे लोक आफ्रिकीसारखे दिसतात” असे सॅम पित्रोदा यांनी वर्णद्वेषी आणि विघटनवादी वक्तव्य केले होते.
यानंतर वारंगळमधील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पित्रोदा यांच्या वक्तव्याबाबत जाब विचारला आहे. .
‘शहजादे आपके जवाब देना पडेगा’. माझ्या देशवासियांचा त्यांच्या त्वचेच्या रंगावरून होणारा अनादर माझा देश खपवून घेणार नाही आणि मोदी हे कदापि सहन करणार नाहीत…”असे ते म्हणाले आहेत .
पीएम मोदी म्हणाले, “मी खूप विचार करत होतो की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अतिशय सन्माननीय व्यक्ती आहेत आणि त्या आदिवासी कुटुंबातून आल्या आहेत , मग काँग्रेस त्यांना पराभूत करण्यासाठी इतके प्रयत्न का करत आहे, पण आज मला त्याचे कारण कळले. कातडीच्या रंगावरुन यांनी ठरवले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकी आहेत. यांचे(कॉँग्रेसचे ) विचार आज समजले. अमेरिकेत एक काका ‘शेहजादा’चे तत्वज्ञानी मार्गदर्शक आहेत आणि क्रिकेटमधील तिसऱ्या पंचांप्रमाणेच हा ‘शेहजादा’ तिसऱ्या पंचाचा सल्ला घेतो, हे कळले.असे म्हणत मोदींनी राहुल गांधी आणि पित्रोदांची खिल्ली उडवली आहे.
“हे तत्वज्ञानी काका म्हणाले की ज्यांची त्वचा काळी आहे ते आफ्रिकेतील आहेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही देशातील अनेक लोकांच्या त्वचेच्या रंगाच्या आधारावर त्यांचा गैरवापर करत आहात…असे म्हणत पंतप्रधानांनी काँग्रेस, राहुल गांधी आणि पित्रोदा यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
हे देशाला कुठे घेऊन जातील? आमच्या त्वचेचा रंग कोणताही असला, तरी आम्ही भगवान कृष्णाची पूजा करणारे लोक आहोत…,” असे मोदी म्हणाले आहेत.
यासगळ्या दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश पुन्हा एकदा पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांशी काँग्रेसचा संबंध नाही असे म्हणत सुटका करून घेतली आहे.