केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी “हा एक नवीन भारत आहे” आणि तो घाबरणार नाही ” असे प्रतिपादन करत काँग्रेस पक्षाचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर आणि काँग्रेसवर टीका केली.केली आहे.
‘चिल पिल’ला 15 एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीत अय्यर म्हणाले की, पाकिस्तान हे एक आदरणीय राष्ट्र आहे ज्याकडे अणुबॉम्ब देखील आहे त्यामुळे भारताने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.
या त्यांच्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेते चांगलेच भडकले आहेत आणि कॉंग्रेस पक्ष नव्या अडचणीत सापडला आहे.
भाजप नेते चंद्रशेखर म्हणाले आहेत की , “.मणीशंकर अय्यर असोत की सॅम पित्रोदा, ते काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि धोरणांचा नमुना दर्शवतात हे मारा नक्की
“ते (अय्यर) पाकिस्तानचा जनसंपर्क करत आहेत. भारताने पाकिस्तानला घाबरून पाकिस्तानचा आदर करायला हवा, असे ते सुचवत आहेत.मात्र हा नवा भारत आहे. तो कुणालाही घाबरणार नाही.मात्र राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष पाकिस्तानच्या दहशतवादासाठी माफी मागणारा बनला आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या व्हायरल व्हिडिओवर भाजपने ताबडतोब हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम काही थांबण्याचे नावच घेत नाहीये. गांधी कुटुंबाच्या अगदीजवळचे अंकल मणी, हे पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार हटविण्यासाठी मदत मागून आले आहेत. ते पाकिस्तानची ताकद काय आहे हे सांगत आहेत”.असा पलटवार भाजपच्या गोटातून शहजाद पुनावाला यांनी केला. आहे.
तर हे तर फारुक अब्दुल्ला यांचे बोल असे म्हणत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पण अय्यर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधी, काँग्रेस, मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. काँग्रेसने आता तरी ही दुहेरी धोरण सोडून द्यायला हवे. ते सध्या फारुक अब्दुल्ला यांची भाषा बोलत आहेत, असा पलटवार गिरीराज सिंह यांनी केला आहे. तसेच पाकिस्तानने भारतासोबत काही आगळीक करायचा प्रयत्न केला तर तो देश जगाच्या नकाशावर राहणार नाही असेही त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही .मणिशंकर अय्यर यांची चांगलीच शाळा घेतली आहे. “हे विधान म्हणजे काँग्रेसच्या मनात भरलेले पाकिस्तान बद्दलचे प्रेम आहे. हे राहतात भारतात आणि मात्र त्यांच्या मनात पाकिस्तान भरलेला आहे. असे अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.
दरम्यान, अय्यर यांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाने त्यांच्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर हे काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
“मणिशंकर अय्यर हे अधिकृत पद धारण करत नाहीत. त्यामुळे ते जे काही बोलतात ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसची अशी कोणतीही भूमिका नाही. काँग्रेस यावर काहीही बोलणार नाही,” असे काँग्रेस नेते उदित राज यांनी सांगितले आहे .