लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे ला होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. राज्यात पहिल्या तीन टप्प्यातील मतदार पार पडले आहे. चौथ्या टप्प्यात राज्यात एकूण 11 मतदार संघात मतदान पार पडणार आहे . तर देशातल्या 10 राज्याचील 96 मतदार संघात मतदान होणार आहे.
राज्यातलया ११ मतदारसंघांमध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या मतदार संघाचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, बीड मधून पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर, हीना गावीत, रक्षा खडसे, हे दिग्गज चौथ्या टप्प्यात मैदानात आहेत.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांचा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असेल. चौथ्या टप्प्यातील अनेक लढती या चुरशीच्या होत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा या लढती असणार आहेत. सर्व पक्षाच्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मतदार संघात सभांचा धडाका लावला होता. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळली होती.
आज शेवटच्या दिवशीही जोरदार प्रचार राज्यात बघायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज सभा होणार आहेत. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याही राज्यात सभा होणार आहेत.