लोकसभा निवडणुकीसाठी ३ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ४ जून रोजी
अंतिम निकाल जाहीर होणार आहे. तर १३ मे रोजी देशात ४ थ्या टप्प्यातील मतदान पार
पडणार आहे. देशभरात ९६ जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११
जागांचा समावेश आहे. ९६ जागांमध्ये अनेक केंद्रीय मंत्री, माजी
मुख्यमंत्री आणि मोठे नेत्यांचे भवित्यव्य मतपेटित बंद होणार आहे.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशमध्ये २५, उत्तर
प्रदेशमध्ये १३, तेलंगणा १७ , महाराष्ट्रामध्ये ११ मध्य प्रदेशमध्ये
८, बिहारमध्ये ५, पश्चिम बंगालमध्ये ८ आणि झारखंडमध्ये ४
तर जम्मू काश्मीरमधील १ व ओडिशामधील ४ जागांवर मतदान पार पडणार आहे. चौथ्या
टप्प्यात आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश,
महाराष्ट्र,
ओडिशा,
तेलंगणा,
उत्तर
प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. एकूण १७१७ उमेदवार निवडणुकीच्या
रिंगणात आहेत.
पाचव्या टप्प्यात 20 मे
रोजी लोकसभेच्या 49 जागांवर, सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी 57 जागांवर आणि
सातव्या टप्प्यात 01 जून रोजी लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे. 04 जून
रोजी निकाल जाहीर होणार आहेत.