आज लोकसभा निवडणुकांसाठी चौथ्या टप्प्यातले मतदान सर्वत्र पार पडत आहे. महाराष्ट्रातील ११ तर देशातील १० राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर, या मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत.
देशभरातल्या ११ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी समोर आली असून पश्चिम बंगाल मध्ये सर्वात जास्त म्हणजे ३२. ७८ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान जम्मू काश्मीरमध्ये झाले असून १४. ९४ टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
देशभरातले सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे
आंध्र प्रदेश 23.10%
बिहार 22.54
जम्मू आणि काश्मीर 14.94%
झारखंड 27.40%
मध्य प्रदेश 32.38%
महाराष्ट्र 17.51%
ओडिशा 23.28%
तेलंगणा 24.31%
उत्तर प्रदेश 27.12%
पश्चिम बंगाल 32.78%