लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज १० राज्यांतील ९६ मतदारसंघात मतदान झाले आहे. महाराष्ट्रात एकून ११ जागांवर मतदान झाले आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – ६०.६० टक्के
जळगाव – ५१.९८ टक्के
रावेर – ५५.३६ टक्के
जालना – ५८.८५ टक्के
औरंगाबाद – ५४.०२ टक्के
मावळ – ४६.०३ टक्के
पुणे – ४४.९० टक्के
शिरूर – ४३.८९ टक्के
अहमदनगर- ५३.२७ टक्के
शिर्डी – ५२.२७ टक्के
बीड – ५८.२१ टक्के