देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत
आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या
निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार
स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात
प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी
महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण कल्याण लोकसभा
मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने,
वंचित
बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे.
राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते
आहेत, हे जाणून घेणार आहोत.
आज आपण ठाणे लोकसभेविषयी जाणून घेणार आहोत. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटातर्फे वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.
शिवसेना फुटल्यानंतर या ठिकाणी मुख्य लढत ही शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी
होणार आहे. कल्याण, ठाणे हे शिवसेनेचे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील
बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे कल्याणमधील निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. २८
उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत शिंदे विरुद्ध दरेकर अशीच होणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी निवडणूक थोडी
अवघड समजली जात आहे. या मतदारसंघातून ते दोन वेळेस निवडून आले आहेत. त्यामुळे या
मतदारसंघात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कल्याण लोकसभा
मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व , डोंबिवली,
कल्याण
ग्रामीण आणि मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. २०१९ च्या निवडणुकीत
श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससचे बाबाजी पाटील यांचा ३,४४,३४३
मतांनी पराभव केला होता.
दरम्यान या जागेवरून देखील महायुतीत रस्सीखेच असल्याचे पाहायला
मिळाले. भाजपचे स्थानिक पदाधिकारी या जागेसाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले.
मात्र ही जागा शिरकांत शिंदे यांनाच मिळणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले होते.
अखेरच्या टप्प्यात या जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आलं होता. त्यामुळे कुठेतरी
महायुतीत या जागेसाठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळाले.
ही जागा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
१९९६ पासून या जागेवर आतापर्यंत या जागवत शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. तसेच
या लोकसभेच्या आत येत असलेल्या ६ विधानसभा मतदारसंघात ५ आमदार हे महायुतीचे आहेत.
तर एक आमदार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये
देखील खुद्द शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तर येथे महायुतीची ताकद जास्त असल्याने
श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र शिवसेनेत पडलेल्या
फुटीनंतर मतदार आणि शिवसैनिक कोणाच्या बाजूने उभा राहतो हे देखील हे पाहणे
महत्वाचे असणार आहे.