लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ५ व्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. राज्यातील १३ जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान मुंबईतील ६ जागांवर आणि ठाणे, कल्याण व पालघर या जागांवरील उमेदवारांसाठी आज मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज सभेसाठी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच मंचावर एकत्रित आले होते. मनसेने महायुतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जर का गांधींजींच्या सल्ल्यानुसार काँग्रेस पक्ष विसर्जित केले असते, तर आज भारत कमीत कमी ५ दशके पुढे गेला असता. माझी गॅरंटी आहे की काही वर्षांनी मी तुमच्यासमोर येईन, तेव्हा आपण जगातील तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेलो असू. माझी गॅरंटी आहे की मी तुम्हाला विकसित भारत करून देणार आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि देशासाठी.”
मोदी पुढे बोलताना म्हणाले, ”विरोधक निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. त्यांना सर्व गोष्टी असंभव वाटत होत्या. राम मंदिर देखील त्यांना होऊ शकत नाही असे वाटत होते. देशातील जनता एक स्वप्न घेऊन तब्बल ५०० वर्षे संघर्ष करत होते याची दखल जगाला घ्यावीच लागेल. आवाज रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. कलम ३७० ची भिंत मी हटवून टाकली आहे. जगातील कोणतीही ताकद कलम ३७० परत आणू शकत नाही.”
महाराष्ट्रात गुतवणूकदारांना इथे एक विश्वास निर्माण झाला आहे. चांगले उपचार देणे यावर आमचा फोकस आहे. आता देशातील ज्या नागरिकांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त त्यांची चिंता आता त्यांच्या मुलांनी करायची नाही. त्यांची चिंता आता मोदी करणार आहे. गेल्या १० वर्षांत केलेली विकासकामे आणि पुढील ५ वर्षांत काय काय करणार याबद्दल देखील मोदींनी भाष्य केले.
आजच्या शिवाजी पार्कवरील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्रीमंडळातील सहकारी , महायुतीचे नेते उपस्थित होते. तसेच मुंबईतील ६ उमेदवार, पालघर, ठाणे , कळ्यांचे उमेदवार देखील उपस्थित होते. एनडीए प्रणित भाजपा सरकारने अब की बार ४०० आणि फार एक बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या आहेत.