आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या ठिकाणी मतदान होत आहे. ४९ जागांसाठी आज देशभरात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य मतदारांसह बॉलिवूड आणि मराठी अभिनेते देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ईव्हीएम मशीनला हार घातल्यामुळे त्यांच्यावर गुन्ह्य दाखल होऊ शकतो.
नाशिकचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला हार घातला. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यांनी केलेले कृत्य हे आचारसंहीतेंचे उल्लंघन असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. मात्र मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून, आम्ही शुभ भावनेतून मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी या घटनेबाबत माहिती मागवली आहे.