लोकसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचे मतदान चालू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटूंब ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीतल्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. ठाण्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाण्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
महिलांनी आज घरातील कामं बाजूला ठेवावीत. सगळ्यांनी मतदानासाठी खाली उतरा, दुसऱ्यांनाही खाली उतरवा आणि नरेश म्हस्के यांना मतदान करा, असे लता शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच श्रीकांत शिंदे हे निवडून येणारच याची आपल्याला खात्री असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांचा सामना उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्याशी असणार आहे.