पंतप्रधान मोदी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान ओडिशातील ढेंकनाल, कटक आणि पश्चिम बंगालमधील तमलूक आणि झारग्राम येथे दोन सभा घेणार आहेत
आज सकाळी त्यांनी भगवान जगन्नाथाची नगरी पुरी येथे रोड शो केला. रोड शो दरम्यान भारतीय जनता पक्षाचे पुरी येथील उमेदवार संबित पात्रा हे देखील त्यांच्यासोबत दिसले. 2019 च्या निवडणुकीत बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांच्याकडून संबित पात्रा यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांची स्पर्धा काँग्रेसचे जया नारायण पटनायक आणि बीजेडीचे अरुप पटनायक यांच्याशी असणार आहे.
रोड शो दरम्यान हजारो लोक पीएम मोदींची एक झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत उभे होते आणि मोदींचे पोस्टर आणि पक्षाचे झेंडे फडकवलेले सर्वत्र बघायला मिळाले. रोड शोनंतर पीएम मोदी थेट जगन्नाथाच्या दर्शनासाठी गेले. येथे त्यांनी जगन्नाथ मंदिरात प्रार्थना केली. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पुरीमध्ये महाप्रभू जगन्नाथांची प्रार्थना केली. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्यावर राहोत आणि आम्हाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यात मदत करेल. धन्यवाद पुरी. देवत्व आणि संस्कृतीशी निगडित असलेल्या या प्रतिष्ठित स्थानाप्रती मी कृतज्ञ आहे. आज सकाळचा रोड शो नेत्रदीपक होता. उष्णतेने गर्दीला येण्यापासून आणि आशीर्वाद देण्यापासून परावृत्त केले नाही”.
.”भारतभरातील रॅलींमध्ये सर्व स्तरातील लोक मला आशीर्वाद देण्यासाठी येतात हे पाहून खूप समाधान वाटतं. ढेंकनाल येथे, उपस्थितांपैकी एक अंगुल येथील तरुण अंशुमन महापात्रा होता. त्याच्या तब्येतीची आव्हाने आणि तीव्र उष्णता असूनही तो रॅलीत आला. ही आपुलकी नम्र आहे आणि मला लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्यास भाग पाडते, “असे पंतप्रधान म्हणाले आहेत. .रोड शोनंतर पीएम मोदींनी ओडिशातील ढेंकनाल येथे जाहीर सभेला संबोधित केले.