लोकसभा निवडणुकीसाठी उद्या ६ व्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात सभा घेत
आहे. तसेच एनडीएने अब की बार ४०० पार
चा दिलेला आहे. त्यावर विरोधक सतत टीका
करताना दिसत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पाचव्या
टप्प्यातील मतदानानंतर इंडीया आघाडीसाठी येणारे निकाल चांगले आहेत. तसेच भाजपा
बहुमतापेक्षा कमी जागा जिंकेल असे मत व्यक्त केले आहे. शशी थरूर ANI शी बोलत होते.
एनआयशी बोलताना शशी थरूर म्हणाले, ”मी आकडेवारी सांगणार नाही पण, सध्या आम्ही जो ट्रेंड पाहत आहोत, तो इंडिया आघाडीची फायदेशीर आहे.” पुढे बोलताना थरूर म्हणाले, ”हा ट्रेंड आम्हाला देशाच्या एका भागात नाही तर सर्वत्र दिसत आहे.
आम्ही आमच्या उमेदवारांच्या विजयासाठी लोकांमध्ये उत्साह पाहत आहोत. भाजपच्या
बालेकिल्ल्यांमध्ये, मतदानात
लक्षणीय घट झाली आहे. आणि मी म्हणेन की आम्ही संख्यांसह येत नसलो तरी, कल एका विशिष्ट दिशेने जात आहे , हे आमच्यासाठी आशादायक आहे.
येत्या ४ तारखेला मतमोजणी झाल्यानंतर
केंद्रात सरकार बदलेल असे देखील शशी थरूर म्हणाले आहेत. इंडिया आघाडी विरुद्ध
एनडीए अशी मुख्य लढत लोकसभा निवडणुकीसाठी देशात होत आहे. ४ जून रोजी देशाची सत्ता
कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए आणि
इंडिया आघाडीने जोरदार प्रचार केला आहे.