पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्शे गाडी चालवत दोघांना उडवले होते. आता या प्रकरणात पोलिसांनी सातवी अटक केली आहे. या प्रकरणात वेदांत अग्रवालचे आजोबा आणि विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
सध्या विशाल अग्रवाल पोलीस कोठडीत आहेत तर अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल बालसुधारगृहात आहे. सर्वात प्रथम वडिल, मग नातू आणि आता आजोबा असे तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधींना अटक करावी लागणे हे दुर्दैव आहे. ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे पोर्शे गाडी चालवत दोन निष्पाप व्यक्तींचे बळी घेतल्यानंतरही आपल्या लाडावलेल्या नातवाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न या आजोबानी म्हणजे सुरेंद्र अग्रवाल यांनी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चौकशी करण्यात आली असता या चौकशीत लाडोबाला आजोबांनी पोर्शेची चावी दिल्याची कबुली चौकशीत दिली होती. तसेच नातू अल्पवयीन असल्यााचा देखील दावा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी केला होता
सुरेंद्र अग्रवाल हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. मात्र नाव जेवढं प्रसिद्ध आहे तेवढेच वादग्रस्त आहे. छोटा राजनशी संबंध असल्याचा आरोप आणि त्यातून त्यांच्यावर आधीपासून गुन्हा दाखल आहे.