लोकसभा निवडणुकीचे ६ टप्पे पूर्ण झाले आहेत. ६ टप्प्यांमधील मतदान
पूर्ण झाले आहे. तसेच ७ व्य टप्प्यातील मतदान बाकी आहे. १जून रोजी उर्वरित ५७
जागांवर मतदान पार पडणार आहे. त्यानंतर ४जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर
होणार आहेत. त्या दिवशी देशात स्पष्ट
होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल आपले मत स्पष्ट
केले तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्तसंस्था ‘IANS’ ला मुलाखत दिली.
यामध्ये ते बोलत होते.
मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ”तपास
यंत्रणांच्या कारवाईमध्ये मोदीची काही भूमिका नाही. भ्रष्टाचार देशासमोरील चिंतेची
बाब आहे. आपल्या देशात जेव्हा जेव्हा लोक भ्रष्टाचारात पकडले जायचे किंवा कोणावर
आरोप व्हायचे तेव्हा लोक शंभर पावले दूर राहायचे. आजकाल त्यांना खांद्यावर घेऊन
नाचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या गोष्टींचा लोक पुरस्कार करत होते,
त्या
आज घडत आहेत आणि म्हणून त्यांचा विरोध आहे. पूर्वी हेच लोक म्हणायचे की सोनिया
गांधींना तुरुंगात टाका.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात
पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ६ टप्प्यातील मतदान
झाल्यानंतर एनडीएने बहुमत पार केले आहे असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे
आहे. त्यामुळे ४ जून रोजी देशातील जनता या देशाची सत्ता पुन्हा एकदा नरेंद्र
मोदींकडे देणार कि इंडिया आघाडीकडे देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.