कोलकाता येथे आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोबाबत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर मोठे आरोप केले आहेत. भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर राज्य यंत्रणा आणि पोलिसांचा गैरवापर करून रोड शोमध्ये व्यत्यय आणल्याचा आरोप केला असून निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
पश्चिम बंगाल भाजपचे सह-प्रभारी आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स अकाऊंटवर याबाबत पुष्टी करणारे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.
काही तासांपूर्वी , मध्यरात्रीच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांच्या रोड शो च्या मार्गावरील विविध ठिकाणी बांधलेले स्टेज बंगाल पोलिसांनी काढली आहेत . त्यांच्याकडे यासाठीच्या सर्व विनंतीची कागदपत्रे आहेत पण ते नाकारणार नाहीत, पण परवानगी देणार नाहीत.”या सर्वाचा उद्देश एवढाच आहे,कि अडथळा आणणे ,असे अमित मालवीय आपल्या पोस्टमध्ये म्हणले आहेत.
मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट आरोप केले आहेत आणि ते म्हणाले आहेत की , “हे राज्य यंत्रणेचा उघड गैरवापर करण्याशिवाय दुसरे काहीही नाही. निवडणूक आयोगाने पुढे येऊन याबाबत योग्य कारवाई करायला हवी.”
पंतप्रधान मोदी आज झारखंडमधील दुमका येथे निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. येथून ते पश्चिम बंगालमध्ये पोहोचतील. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदी दुपारी 2:30 वाजता बारासात आणि दुपारी 4 वाजता जाधवपूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करतील. यानंतर, संध्याकाळी कोलकाता उत्तरमध्ये रोड शो करणार आहेत. रोड शोनंतर पंतप्रधान सात वाजता स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील