लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जेष्ठ नेते आणि सर्वात मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमध्ये एका विशाल फतेह रॅलीला संबोधित करणार आहेत. भाजपने त्यांचे सर्वात मोठे आणि लोकप्रिय स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा निवडणूक कार्यक्रम त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.
यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत 400 पार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभरात व्यापक प्रचार करून मतदारांचे आशीर्वाद घेतले आहेत. आज पंजाबमधील होशियारपूर येथील मतदारांचे आशीर्वाद घेऊन आज ते कन्याकुमारीला रवाना होतील. भाजपच्या एक्स हँडलनुसार, पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता पंजाबच्या होशियारपूरमध्ये मोठ्या फतेह रॅलीला संबोधित करतील. 1 जून रोजी लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे.